Friday, March 13, 2020

संगणक आणि आपण...

सध्याचं युग हे इंटरनेट शिवाय चालू शकते अशी कल्पनाही करणे म्हणजे आपण काही तरी विसरत नाहीत ना असं वाटायला लागते. यावरून आपण कल्पना करू शकतो की आपण तंत्रज्ञानाच्या किती आहारी गेलेलो आहोत... 

Wednesday, March 11, 2020

संगणक वारंवार बंद होत असेल किंवा बंद होऊन सुरू होत असेल तर, हे करून बघा....

जर तुमच संगणक वारंवार बंद होत असेल किंवा बंद होऊन सुरू होत असेल तर, हे करून बघा....
१. सर्व प्रथम तुमच्‍या संगणकाचे पावर सप्‍लाय (SMPS) तपासा, कारण तुमच्‍या संगणकाला पुरेसा पावर मिळत नसेल तर संगणक वारंवार बंद पडू शकतो.
२. नंतर, तुमच्‍याकडे दुसरा पावर सप्‍लाय (SMPS) उपलब्‍ध असेल तर, ते वापरून बघा. जर, तुमचा संगणक सुरळीतपणे काम करत असेल तर, पावर सप्‍लाय (SMPS) बदला.
३. जर, संगणक पावर सप्‍लाय (SMPS) बदलून सुध्‍दा सुरळीत चालत नसेल किंवा उगोदर असलेली समस्‍या परत असेल तर, इलेक्‍ट्रीसीयन कडून संगणकाच्‍या पावर सप्‍लाय (SMPS) मध्‍ये जाणारा विद्युत उर्जेचा व्‍होल्‍टेज तपासून घ्‍या... जर विद्युत उर्जेचा व्‍होल्‍टेज १२०v पेक्षा जास्‍त ते २२०-२४०v पर्यंत आणि असेल तुमचा पावर सप्‍लाय (SMPS) या व्‍होल्‍टेजला सपोर्ट करत असेल तर तुमच्‍या संगणकाच्‍या मदरबोर्डमध्‍ये प्राब्‍लेम आहे... याबाबत संगणक तज्ञाकडून तपासून घ्‍यावे....